गावाचा इतिहास 📜 “भूतकाळाच्या पाऊलखुणांतून उज्वल भविष्याकडे”
- आपल्या महाराष्ट्रातील प्रत्येक गावामागे एक संपन्न इतिहास, परंपरा आणि अभिमानाची कहाणी दडलेली आहे. शतकानुशतकांपूर्वी स्थापन झालेलं हे गाव शेतकरी, कारागीर आणि समाजसेवकांच्या परिश्रमावर उभं राहिलं आहे. गावाच्या ओसरीवरून वाहणारा पाण्याचा ओघ, देवळातील घंटांचा नाद आणि सकाळच्या आरत्या — हे सगळं एक जीवंत संस्कृतीचं प्रतिबिंब आहे. इथल्या मातीचा सुगंध हा केवळ शेतीचा नाही, तर परिश्रम, श्रद्धा आणि एकतेचा सुगंध आहे. प्रत्येक घर, प्रत्येक झाड, प्रत्येक वाडी यामागे काहीतरी आठवण आणि योगदान जोडलेलं आहे. पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या लोककथा, गाणी आणि परंपरा आजही या गावाची ओळख आणि अभिमान टिकवून आहेत. अनेक गावांनी स्वातंत्र्य संग्रामात योगदान दिलं, काही गावं सामाजिक चळवळींचं केंद्र ठरली, तर काहींनी शिक्षण आणि संस्कारांची ज्योत पेटवली. ग्रामपंचायत ही फक्त प्रशासन नाही, तर गावाच्या विकासाचं आणि ऐक्याचं प्रतीक आहे. आजही या गावात जुन्या काळचा साधेपणा आणि आधुनिक प्रगती यांचा सुंदर संगम दिसून येतो. मंदिरातील दीपज्योत, तलावाचं पाणी आणि वाड्यांमधील एकत्र राहण्याची पद्धत — हे सर्व गावाच्या संस्कारांचं मूळ आहे. ❤️ या गावाचा इतिहास फक्त भूतकाळ नाही, तर तो आजच्या आणि उद्याच्या पिढ्यांसाठी प्रेरणेचा दीपस्तंभ आहे. येथे प्रत्येक व्यक्ती आपल्या गावाबद्दल अभिमान बाळगते, कारण हेच गाव तिच्या मुळांची ओळख आणि संस्कृतीचं मूळ आहे. या मातीने अनेक शेतकरी, कलाकार, शिक्षक आणि सैनिक घडवले, ज्यांनी महाराष्ट्राचं आणि देशाचं नाव उज्ज्वल केलं. म्हणूनच — प्रत्येक गाव हा एक जिवंत वारसा आहे, आणि प्रत्येक नागरिक हा त्या वारशाचा अभिमानी भाग आहे.
-
छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शान पावन झालेल्या ‘पिरामिठावाडी‘ असे मुळ नाव असलेले या गावात सैन्यासाठी लागणारे हत्ती, घोडे यांचा तळ असायचा. आणि या तळावरती लढाईचे प्रशिक्षण दिले जायचे त्यांनंतर शस्त्र सज्ज झालेले सैन्य, हत्ती, घोडी वेगवेगळ्या ठिकाणी पाठविले जायचे. त्यामुळे या गावची लष्करी तळ म्हणून इतिहासात स्पष्ट नोंद आहे. पुढे गावामध्ये असलेल्या जागृत पीर देवस्थानामुळे पिराचीवाडी हेच नाव पुढे रूढ झाले.
-
कागल पासून पश्चिमेला २०ते२२ किलोमीटर अंतरावर असणारे पिराचीवाडी हे अत्यंत दुर्गम व डोंगराळ भागातील सर्व सोयीसुविधा पासून वंचित असलेले छोटेखाणी खेडेगाव पुर्विच्या काळी पिराचीवाडीचे नाव घेतले,की हे कुठे आलं गाव अशी विचारणा व्हायची. पण हि सारी ओळख पुसून टाकून गावाने विकासाची नवी कात टाकली. आणि या गावाची ओळख बदलली गेली स्मशान भूमीमुळे. मरण आले तर पिराचीवाडीतच यावे, अशी जगावेगळी इच्छा निर्माण करणारी अत्यंत देखणी स्मशानभूमी, ज्या स्मशानभूमीत वाढदिवस साजरे केले जातात सेल्फी पॉईंट म्हणून स्मशानभूमीची ओळख होते. ती बघायला अनेक भागातून लोक पिराचीवाडीत आपले पाय वळवतात. सुंदर लेखणी आणि कल्पक विचारातून साकारलेली ही स्मशानभूमी गावाचा डंका चहोमुलकात गाजवत आहे. या कामी ग्रामस्थांचे मार्गदर्शन आणि सहकार्य मिळाले.
-
संपूर्ण महाराष्ट्रात हमालांचा गाव असा नामोल्लेख पिराचीवाडी गावचा होत असे, प्रथमतः गावाचा हा नामोल्लेख पुसून टाकण्याचा निर्धार पहिले लोकनियुक्त सरपंच श्री. सुभाष भोसले यांनी घेतला. “आयुष्यात योग्य ठिकाणी पोहोचण्यासाठी वेगापेक्षा दिशेला फार महत्त्व असते”. हे जाणून पिराचीवाडी गावातील प्रत्येक कुटुंबाचा आर्थिक स्तर कसा उंचावता येईल याचा विचार सरपंच सुभाष भोसले यांनी केला आणि या कल्पक विचारला साथ दिली ती त्यांची सुविद्य पत्नी सौ. कल्पना सुभाष भोसले यांनी कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या सौ. कल्पना सुभाष भोसले यांनी दृढ संकल्पी आपल्या पतीला जिद्दीने साथ देत गावाला सात किलोमीटर अंतरावरून शेतीसाठी पाणी आणण्याचे धाडस केले. त्यामुळे शेतातून उत्पन्न सुरू झाले सोबत दुग्ध व्यवसायाचा हातभार लागल्यामुळे गावातील प्रत्येक कुटुंबाचा आर्थिक स्तर उंचावण्यात मदत झाली. सन 2023 साली पहिल्या महिला लोकनियुक्त सरपंच होण्याचा मान संकल्पना सुभाष भोसले यांना मिळाला. सरपंच पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर त्यांनी संपूर्ण जगाला जी प्लास्टिकचे समस्यांनी ग्रासले आहेत त्यावर उपाय करण्याचे ठरवले. प्लास्टिक कचऱ्यामुळे होणारी पर्यावरणाची नुकसान तसेच मानव जातीचे सगळ्यांना होणारा त्रास लक्षात घेता प्लास्टिक वापरावर बंदी आणि त्याची योग्य विल्हेवाट करणे काळाची गरज आहे. प्लास्टिक वापरामुळे पर्यावरणावर जमिनीचे प्रदूषण जल प्रदूषण हवेचे प्रदूषण वन्य जीवावर होणारा परिणाम नैसर्गिक अधिवस्यांना तसेच मानवी आरोग्यावर मायक्रो प्लास्टिकचा शरीरात प्रवेश विशाल रसायनाचा संपर्क श्वसनाचे आजार प्रतिकारक शक्तीवर होणारा परिणाम लहान मुलावर परिणाम असे अनेक गंभीर समस्या निर्माण होतात यावर उपाय म्हणून त्यांनी प्रथम आपल्या गावापासून सुरुवात करण्याचा निर्णय घेतला. त्यामध्ये प्लास्टिक वापर बंदी ठराव केला. तसेच गावातील एकूण ३६५ कुटुंबांना प्रत्येकी २ याप्रमाणे कचराकुंडीचे वाटप केले. गावामध्ये ४ प्लास्टिक संकलन केंद्र व १ मुख्य प्लास्टिक संकलन केंद्र उभा केले जमा होणाऱ्या प्लास्टिकची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी त्यांनी योग्य ती काळजी घेतली. घरगुती वापरासाठी कापडी पिशव्यांची वाटप केले आणि समाज प्रबोधन करून गावांमध्ये आपल्या जीवनावर होणारा प्लास्टिकचा होणारा दुष्परिणाम लोकांच्या लक्षात आणून दिला.
-
त्यानंतर त्यांनी अपारंपारिक उर्जा स्त्रोत सूर्य आणि याच सोलर उर्जेचा वापर करून त्याचा फायदा आपल्या गावातील कुटुंबांना कसा होईल यावर भर देऊन पिराचीवाडी गावामध्ये एकूण 102 स्ट्रेटलाईट पोल व दोन सार्वजनिक पिण्याचे पाणीपुरवठा योजना सोलर उर्जेवर कार्यान्वित केल्या आहेत त्यामुळे गावातील 40% लोकांना व प्राथमिक शाळेत Aqua Water Furifier System बसवून सर्व लहान मुलांना स्वच्छ व मुबलक पिण्यासाठी पाणी उपलब्ध करून दिले. उर्वरित 60% लोकांना सोलार पाणी योजनेतून २४ तास पाणी उपलब्ध करण्याचा माझा प्रयत्न आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीचा वरचा विजेचा भार कमी होणारच आहे. तसेच यापुढे गावातील सर्व 365 कुटुंबांना व सर्व शासकीय इमारती आणि सर्व मंदिराच्या छतावर एक किलोवॅट सोलर लाईट देऊन प्रत्येक कुटुंबावरील व ग्रामपंचायतीवरील विजेचा भार शंभर टक्के कमी करण्याचा माझा प्रयत्न असणार आहे. नवीन पाणीपुरवठा योजना संपूर्ण सोलर कार्यान्वित करण्याचा माझा मानस आहे.
-
झाडे ही पृथ्वीवरील पर्यावरणाचा महत्त्वाचा घटक आहे मानवाच्या अस्तित्व निसर्गाचा समतोल व पर्यावरणाचा टीकाव करण्याची क्षमता यामध्ये झाडाचे योगदान अमूल्य असते पण दुर्दैवाने मानवाचे प्रगतीच्या नावाखाली जंगलतोड आणि पर्यावरणाचा ऱ्हास केला त्यामुळे पृथ्वी सजीव सृष्टी धोक्यात आली. पिराचीवाडी गावामध्ये २०२३ साली ५०० झाडे, २०२४ साली ५०० झाडे लावून त्याचे संगोपन केलेले आहे व २०२५ साली १००० फळ झाडे, फुल झाडे, शोभेची झाडे लावून त्याचे संगोपन करण्याचा मानस आहे, वृक्ष तोडीवर बंदी घालून जुन्या १०० वर्षे पूर्वीच्या झाडांचे संवर्धन केले आहे.
-
मौजे पिराचीवाडी गावात ३२२ कुटुंबापैकी २२५ कुटुंबाकडे गोबर गॅस शौचालये आहेत. तसेच ९७ कुटूंबाकडे सेप्टीक शौचालये आहेत तसेच त्याचे सांडपाणी निचरा करण्यासाठी वैयक्तिक शोषखड्डे बांधून घेतले आहेत. सर्व कुटुंबांचे साडपाणी व्यवस्थापन परसबागेत केले. त्याचप्रमाणे ग्रा.प.सार्वजनिक ठिकाणी कचराकुंड्या, सर्व शासकीय कार्यालयामध्ये कचराकुड्या वापर, तसेच सर्व मंदिरे, तसेच प्रत्येक घरात ओला कचरा व सुका कचरा व्यवस्थापन केले जाते. मौजे पिराचीवाडी गावात राष्ट्रीय बायोगॅस तसेच घरगुती गॅस जोडणी करण्यात आली आहे गावात सार्वजनिक ठिकाणे, गल्ली, रस्ते यांची लोक सहभागातुन स्वच्छता केली जाते.
-
गावाला कुस्तीचा मोठा इतिहास आहे उपमहाराष्ट्र कलेचे मानकरी पैलवान रामा माने हा या गावचा थोर सुपुत्र, तर पैलवान कुमारी सृष्टी भोसले ही राष्ट्रीय महिला मल्ल देशभरात कुस्तीचा आखाडा गाजवत आहे. उपजतच कुस्ती प्रेम असलेल्या गावातच मैदान बांधायचे ठरवले आणि मग छोट्याशा गावात साकारले मिनी खासबाग मैदान,
-
गावाचा कारभार चालवणाऱ्या ग्राम सचिवालयाची इमारत नामदार मुश्रीफ साहेबांनी देऊ केलेल्या भरगच्च निधीमुळे अवघ्या सहा महिन्याच्या कालावधीत बांधून नीट नेटके व हाय- फाय असे ग्राम सचिवालय उभे झाले. गावाच्या मध्यभागी दत्त मंदिराचा केलेला कायापालट या मंदिरात विठ्ठल रुक्माई संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करून गावाच्या भक्तीमय वातावरणात भर घातली. सध्या यामुळे दत्त जन्मकाळ, श्री कृष्ण अष्टमी आणि एकादशीला भजन किर्तनाचा जयघोष महाप्रसाद तसे नित्य नियमाने अखंड नामस्मरण हरिपाठ आणि आरती यामुळे भक्तिमय वातावरणात ग्रामस्थ तल्लीन झालेले दिसतात. हनुमान मंदिर व महादेव मंदिराचे काम पूर्ण झाले असून. ग्रामदैवत गहिनीनाथ मंदिराची हि जीर्णोद्धाराची काम आता हाती घेण्यात आलेले आहे.
-
मुलांच्या शिक्षणाचा पाया मजबूत करण्याच्या दृष्टीने दोन अंगणवाड्या बांधून काढल्या, गटातटाचा विचार न करता ग्रामपंचायतीच्या वतीने गावातील यशस्वी विद्यार्थ्यांच्या पाठीवर शाब्बासकीची थाप देण्याचा तसेच गावाच्या नावलौकिकात सर्वदूर पसरणाऱ्या ग्रामस्थांचा सत्कार करण्याची नवीन स्तुत्य आणि अभिनव प्रथा सुरू केली आहे.
-
पिराचीवाडीच्या सर्वधर्म समभावाचे वर्णन धुमधडाक्यात दिवाळी उत्साहात होतो रमजान गावात एकाच वेळी वाचली जाते गीता आणि कुराण, असेच करावे लागेल. मुस्लिम बांधवांसाठी प्रार्थनास्थळ मस्जीत उभा केली आहे.
-
गावातील सर्व रस्त्यांची डांबरीकरण आणि रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावून त्यांना ठिबक सिंचनाद्वारे पाणी देऊन पाणी बचती बरोबर गावाच्या हिरवाई मध्ये भर घातली आहे. पिराचीवाडीत सूर्य कधीच मावळत नाही असे म्हटले जाते. ती किमिया झाली आहे ती हाय मास्ट दिव्यांमुळे, गावात प्रत्येक चौकात १२ ठिकाणी उभारलेल्या हाय मास्ट दिव्यांमुळे गावाचा अंधकार दूर करत विद्युत रोषणाईने गाव उजळून निघाला आहे.
-
छत्रपती शिवरायांनी बांधून घेतलेल्या बुरुजावर शिवछत्रपतींच्या अश्वा रूढ पुतळा उभारण्याचे काम सुरु आहे. केवळ नामदार हसन मुश्रीफ साहेबांच्या भरीव आर्थिक निधीमुळे या ठिकाणी शिवसृष्टी. शिवाजी महाराजांचे पाण्यामधील स्मारक उभारण्या बरोबरच तलाव सुशोभीकरण करण्याचाही निर्धार केला आहे.
-
या सर्व कामाची शासकीय यंत्रणेसह सर्वांना दखल घ्यावीच लागेल. संपूर्ण कागल तालुक्यातच नव्हे, महाराष्ट्रात प्रथम येण्यासाठी आता गाव सज्ज झाला आहे.
-
जीवनात यश-अपयश येत राहते. आपण यशस्वी झाल्यावर स्वतःची पाठ थोपटून घेतो. अपयश आल्यास दुसऱ्याकडे बोट दाखवतो. खरे ना?
-
वास्तविक हा दृष्टिकोन उलट हवा.म्हणजे यशस्वी झाल्यावर या प्रवासात आपल्याला कोणा कोणाची साथ मिळाली, आधार मिळाला त्यांचा आवर्जून उल्लेख केला पाहिजे. तर अपयश आल्यास आत्मनिरीक्षण करून आपल्या त्रुटी दूर करण्यावर भर दिला पाहिजे. आपल्या प्रत्येक लहान – मोठ्या गोष्टीत इतरांचा सहभाग असतो. आपले आई-वडील, कुटुंबीय, मित्र परिवार व गुरुजन यांचा मोठा वाटा असतो. तो मान्य करणे, त्यांच्याशी कृतज्ञ राहणे व इतरांना असाच मदतीचा हात देणे हे लक्षात घेतले पाहिजे.आपले यश हे आपल्या एकट्याचे कधीच नसत… तर ते आपल्या सहकाऱ्यांचे, मित्र परिवाराचे असते…
धन्यवाद…