पिराचीवाडी (ता. कागल) यथे ग्रामपंचायतीच्या वतीने सौर उर्जा प्रकल्प यशश्वीपणे उभारण्यात आला आहे. वाढत्या वीज खर्चाला आला घालण्यासाठी तसेच पर्यावरण संरक्षणासाठी हा महत्वाचा उपक्रम राबविण्यात आला आहे . ग्रामपंचायत कार्यालयाच्या इमारतीवर सौर पॅनल बसविण्यात आले असून यामुळे विजेची मोठ्या प्रमाणावर बचत होणार आहे. तसेच हा प्रकल्प स्वच्छ व नुतनीकरण उर्जेचा वापर वाढविण्यासाठी एक आदर्श उदाहरण ठरत आहे. या उपक्रमामुळे गावाला स्वंयपूर्णतेकडे वाटचाल करता येणार असून भविष्यात इतर ठिकाणीही असे प्रकल्प राबविण्याचा विचार ग्रामपंचायतीने व्यक्त केला आहे.
“हरित उर्जा – स्वच्छ पर्यावरण” या संकल्पनेला पिराचीवादीचा पुढाकार!


