पिराचीवाडीतील (ता. कागल), डॉ. संजय हिंदुराव दाभोळे हे एनआयटी कॉलेजमध्ये प्रोफेसर म्हणून निवड आणि गीता संजय डावरे यांची पंजाब नॅशनल बँकेत कृषी सहायक म्हणून निवड झाल्याबद्दल सरपंच मा. सुभाष पांडुरंग भोसले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यांच्या या यशाबद्दल गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. निवड झालेल्या उमेदवारांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित कार्यक्रमात गावातील प्रमुख नागरिक, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. निवड झालेल्या सदस्यांनी बँकेच्या प्रगतीसाठी व पारदर्शक कारभारासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.
गीता डावरे यांनी आपल्या यशाचे श्रेय कुटुंबीय व मार्गदर्शकांना देत बँकेच्या प्रगतीसाठी व ग्राहकांना उत्कृष्ट सेवा देण्यासाठी प्रामाणिकपणे काम करण्याचे आश्वासन दिले.या प्रसंगी उपस्थितांनी निवड झालेल्या सदस्यांचे कौतुक करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.