Skip to content
महाराष्ट्र शासन
Menu
Menu

शेतकऱ्यांना मशागतीसाठी २५ टक्के अनुदानावर ट्रॅक्टर पिराचीवाडी ग्रामपंचायतीचा अभिनव उपक्रम

सविस्तर माहिती

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानअंतर्गत गावचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी धडपड करणाऱ्या कागल तालुक्यातील पिराचीवाडी ग्रामपंचायतीने गावातील शेतकऱ्यांना शेतीकामांसाठी २५ टक्के अनुदानावर ट्रॅक्टर ट्रॉली उपलब्ध करून दिली आहे. यासाठी ग्रामपंचायतीने सर्व आवजारांसह ट्रॅक्टर ट्रॉलीची खरेदी केली आहे. अशी योजना देणारी राज्यातील ही एकमेव ग्रामपंचायत असून, इतरानांही आदर्शवत आहे. घरफाळा पाणीपट्टी भरलेल्या शेतकऱ्यांनाच या योजनेचा लाभ देण्याचा निर्णय ग्रामपंचायत प्रशासनाने घेतला आहे. एकेकाळी हमालांचे गाव म्हणून जिल्ह्यात परिचित असणारे पिराचीवाडी मशागतीसह शेतोपयोगी हे गाव समृद्ध आणि स्वायत्त बनले आहे. दुर्गम डोंगराळ भागात असणाऱ्या या गावात रस्ते आरोग्याची वानवा होती. त्याशिवाय पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या पाण्याचेही दुर्भिक्ष होते. आठ वर्षांपूर्वी सुभाष भोसले यांनी सरपंचपदाची सूत्रे हातात घेतली आणि विकासाचे मॉडेल म्हणून गावचे नाव राज्याच्या नकाशावर पोहचविण्याचा चंग बांधला. दूधगंगा नदीतून तीन टप्प्यांत पाणी योजना साकारली. त्यामुळे येथील पिण्यासह शेतीच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागला. नांगरणीपासून सर्व कामे करणार … अनेकदा शेती हा धंदा बेभरवशाचा होतो. त्यामुळे सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांचा निर्णय होऊन ट्रॅक्टर ट्रॉली खरेदी केली आहे. यामध्ये खत ओढवणीपासून शेताची नांगरट, रोटर, सरी सोडण्यापर्यंतची सर्व कामे २५ टक्के अनुदानावर करण्यात येणार आहेत.

फोटो

टीप : "स्लाइडशो सुरू करण्यासाठी कोणत्याही फोटोवर क्लिक करा..."

व्हिडिओ

Skip to content