Skip to content
maha-logo
महाराष्ट्र शासन
Menu
Menu

प्रादेशिक पर्यटन विकास योजना २०२३-२४ – मौ. पिराचीवाडी, ता. कागल येथील हनुमान मंदिर परिसर सुधारणा करणे.

पूर्ण झालेली कामे
WhatsApp Image 2026-04-15 at 2.24.50 PM

सविस्तर माहिती

पिराचीवाडीतील हनुमान मंदिर – ₹२.२५ कोटी (225 लाख) विकास कामाची माहिती -:

पिराचीवाडी गावातील हनुमान मंदिर परिसरात अंदाजे ₹२.२५ कोटी निधीतून विविध विकासकामे हाती घेण्यात आली असून, मंदिराचे सुशोभीकरण व भाविकांसाठी सोयीसुविधा निर्माण करण्यात येत आहेत. पिराचीवाडी गावातील हनुमान मंदिर परिसराचा सर्वांगीण विकास करून धार्मिक पर्यटनाला चालना देणे, ग्रामस्थांना सुविधा उपलब्ध करून देणे व गावाचा सर्वांगीण विकास साधणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.

कामांचा तपशील:

  • मंदिराचे नूतनीकरण व सुशोभीकरण
  • सभामंडप बांधकाम व विस्तार
  • मंदिर परिसरात पेवर ब्लॉक बसविणे
  • प्रकाश व्यवस्था (लाईट/सोलर लाईट)
  • पिण्याच्या पाण्याची व्यवस्था
  • स्वच्छतागृह बांधकाम
  • हरितीकरण व वृक्षारोपण
  • परिसराची संरक्षण भिंत (Compound Wall)
  • बसण्याची व्यवस्था (बैठक व्यवस्था)
  • मंदिर रंगरंगोटी 

या कामांमुळे मंदिर परिसर अधिक आकर्षक, स्वच्छ व भाविकांसाठी सोयीस्कर झाला असून गावाच्या विकासात महत्त्वाची भर पडली आहे.

फोटो स्वरूप दाखवणारे फोटो

टीप : "स्लाइडशो सुरू करण्यासाठी कोणत्याही फोटोवर क्लिक करा..."

व्हिडिओ स्वरूप दाखवणारे व्हिडिओ

Skip to content