स्वच्छ हवा, पाणी आणि परिसर ही ग्रामीण जीवनाची संकल्पना तंतोतंत वास्तव्यात आणलेली पिराचीवाडी गावातील विकासकामे पाहताना गावच्या एकसंघपनाची हवा वाटते, असा शब्धात जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांनी गावकऱ्यांच्या कामावर समाधानाची भावना व्यक्त केली. येथील नियोजन आणि दूरदृष्टी इतर गावानाही अनुसरण्यासारखी आहे, असे गौरवोद्वार त्यांनी काढले.
पिराचीवाडी येथील मंजूर असणाऱ्या घरकुल योजनेतील लाभार्थ्यांना घरकुलाचा पाया खुदाई प्रारंभ व मुख्यमंत्र्यांच्या समृद्ध ग्राम योजनेत सहभागी म्हणून या गावाला भेट असा संयुक्त हेतूने त्यांनी दौरा केला. आरोग्यस्थानांची सर्वेक्षणे करून माहिती घेतली. कार्तिकेयन एस. यांनी जवळपास साडेतीन तास गावातील विकासकामाची पाणी करून सविस्तर माहिती घेतली. गावाची स्वच्छता, दुतर्फा लावलेली झाडे, ग्रामपंचायत इमारत, ऐतिहासिक दगडी बुरुज आणि सालात असलेली शिवापुत्री पर्यटनस्थळ अशी बंधुवृती कृती आढळली.
वृक्षसंवर्धनाचे कार्य आवर्जून कार्तिकेयन म्हणाले, मुख्य मार्गासह गावातील रस्त्यांच्या दुतर्फा नियोजनबद्ध लावलेली झाडे गावाला सौदंर्य भर घालणारी आहे. ही बाब कौतुकास्पद आहे. यावेळी उपस्थित गट विकास अधिकारी कुलदीप भोंगे, आरोग्य अधिकारी फारूक देसाई, गट शिक्षनाधिकारी सारीका कासोटे, माजी सरपंच सुभाष भोसले, उपसरपंच कृष्णा पाटील, नवनाथ भोसले, नामदेव पाटील, सोमेश सावंत, धनंजय भोसले, रत्नाकर जाधव आदी उपस्थित होते.