Skip to content
maha-logo
महाराष्ट्र शासन
Menu
Menu

पिराचीवाडीतील पिंक रूम आदर्श माॅडेल

WhatsApp Image 2026-03-13 at 2.38.09 PM (1)

सविस्तर माहिती

‍पिराचीवाडी (ता. कागल) येथील प्राथमिक शाळेत उभारलेली पिंक रूम ही राज्यातील जिल्हा परिषद शाळांमधील आदर्श माॅडेल असल्याचे सीईओ एस. कार्तिकेयन यांनी गौरवोदगार काढले. मासिक पाळीदरम्यान  मुलीना विश्रांती, नॅपकिन,औषधे व आवश्यक सुविधा मिळाव्यात म्हणून ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या सूचनेनुसार हा उपक्रम राबविला असून, ग्रामपंचायतीच्या सहकार्याने सर्व सोयींनीयुक्त पद्धतीने उभारणी करण्यात आली आहे.

‍पिराचीवाडी (ता. कागल) येथील प्राथमिक शाळेत किशोरी अभियानांतर्गत पिंक रूमच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी  सरपंच कल्पना भोसले होत्या. यावेळी गटविकास अधिकारी कुलदीप बोंगे, प्रभारी गट शिक्षणाधिकारी सारिका कासोटे, तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. फारूक देसाई प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

कासोटे म्हणाल्या, ‘पिंक रुममुळे मुलींना निर्भयपणे महिनाभर शाळेत उपस्थित  राहता येणार आहे. यामध्ये मुलींना विश्रांती घेता येणार असून येथे नॅपकिन पेपर, आयुर्वेदिक औषधे तसेच  हळद, गुळ, गरम पाण्याची पिशवीही ठेवण्यात येणार आहे.

सरपंच कल्पना भोसले म्हणाल्या, ‘मुख्यमंत्री समृद्ध ग्राम योजनेत सहभागी असण्याऱ्या म्हाकवे  गावाने अनेक लोकोपयोगी उपक्रम हाती घेतले आहेत. त्यापैकी किशोरवयीन मुलींसाठी अत्यंत उपयुक्त असणारा  पिंक रूमचा उपक्रम अत्यंत काळजीपूर्वक आणि सर्व सोयीनयुक्त राबविला आहे.

लक्ष्मी पाटील यांनी स्वागत केले. माजी सरपंच सुभाष भोसले, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष नाथाजी भोसले, नामदेव पाटील,  उपसरपंच कल्पना पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास कोमल सावंत, युवराज माने, कृष्णात भोसले आदी उपस्थित होते. मुख्याध्यापक के. आर. पाटील यांनी आभार मानले.

व्हिडिओ

Skip to content