Skip to content
महाराष्ट्र शासन
Menu
Menu

पिराचीवाडी ग्रामविकासाचा आदर्श नमुना

प्रकाशित दिनांक : March 6, 2026

सविस्तर माहिती

पिराचीवाडी (ता. कागल) येथे घरकुल योजनेतील लाभार्थ्याच्या घरकुल पायाखुदाईचा प्रारंभ तसेच मुख्यमंत्री समृध्द ग्राम योजनेत सहभागात गावभेट असा संयुक्त कार्यक्रम आयोजित केला होता. कार्यक्रमास मा. मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. उपस्थित होते. अध्यक्षस्थानी सरपंच कल्पना भोसले होत्या. कार्तिकेयन म्हणाले, ‘गावच्या मुख्य मार्गासह अंतर्गत रस्त्याच्या दुतर्फा नियोजनबद्ध लावलेली झाडे गावाच्या सौंदर्यात भर घालत आहेत. ग्रामपंचायत प्रशासनाने ठिबक सिंचनाचा वापर करून वृक्षसंवर्धनाला चालना दिली असून, मोकळ्या जागांमध्ये वनराई निर्माण केली आहे. ही बाब निश्चितच कौतुकास्पद आहे. कार्तिकेयन यांनी जवळपास साडेतीन तास गावातील विविध विकासकामाची पाणी करून सविस्तर माहिती घेतली. अदयावत ग्रामपंचायत इमारत, प्राथमिक शाळेची देखणी इमारत, अंगणवाडी, ऐतिहासिक बुरुज, साकारत असलेली शिवसृष्टी, पर्यटनस्थळासारखी विकसित करण्यात आलेली वैकुंठभूमी, कुस्ती आखाडा, रस्त्यांच्या दुतर्फा नियोजनबद्ध वृक्षरोपण तसेच गहिनीनाथ मंदिरानजीक केलेल्या वृक्षारोपणाची त्यांनी पाणी केली. यावेळी गटविकास अधिकारी कुलदीप बोंगे, गटशिक्षणाधिकारी सारीका कासोटे, तालुका आरोग्य अधिकारी फारूक देसाई, माजी सरपंच सुभाष भोसले, उपसरपंच काल्पना पाटील, नाथाजी भोसले, नामदेव पाटील, कोमल सावंत, युवराज माने, कृष्णात भोसले, आदी उपस्थित होते.

व्हिडिओ

Skip to content