पिराचीवाडी (ता. कागल) येथे ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने प्राथमिक शाळा, अंगणवाडी तसेच गावातील आड (विहीर/पाणी व्यवस्था) येथे सौर उर्जा प्रकल्प यशश्वीपणे सुरु करण्यात आला आहे.
या उपक्रमामुळे शाळा व अंगणवाडीतील वीज पुरवठा सुरळीत होणार असून विद्यार्थ्यांना चांगल्या सुविधा मिळणार आहेत. तसेच गावातील आडवर सौर पंप बसविण्यात आल्यामुळे पाण्याची समस्या सोडविण्यास मदत होणार आहे.
सौर उर्जेच्या वापरामुळे वीज खर्चात बचत होऊन पर्यावरण संराक्षणालाही हातभार लागणार आहे. हा प्रकल्प स्वच्छ व नुतनीकरणीय ऊर्जेकडे गावाची वाटचाल दर्शवतो.
ग्रामपंचायातीच्या या उपक्रमामुळे पिराचीवाडी गाव इतर गावांसाठी आदर्श ठरत असुस्न भविष्यात अश्या आणखी योजनांची अंमलबजावणी करण्याचा मानस व्यक्त करण्यात आला आहे.
“सौर उर्जा – गावाच्या प्रगतीचा नवा मार्ग”




