पिराचीवाडी गावातील शाळेमध्ये मुलींसाठी सुरक्षित, स्वच्छ व सन्मानपूर्वक वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी ‘पिंक रूम’ उभारण्यात आली आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थिनींच्या आरोग्य, स्वच्छता व आत्मविश्वासात वाढ होण्यास मदत झाली आहे. पिराचीवाडी गावात महिलांसाठी व मुलींसाठी सुरक्षित व स्वच्छ सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ₹१० लाख निधीतून “पिंक रूम” प्रकल्प राबविण्यात आला आहे.
कामांचा तपशील:
१) पिंक रूम बांधकाम
- स्वतंत्र, सुरक्षित व सुसज्ज खोली
- हवेशीर व स्वच्छ वातावरण
- आकर्षक रंगसंगती (पिंक थीम)
२) आरोग्य व स्वच्छता सुविधा
- सॅनिटरी नॅपकिन उपलब्धता
- नॅपकिन डिस्पोजल मशीन / डस्टबिन
- स्वच्छ पाण्याची व्यवस्था
३) विद्यार्थिनींसाठी सुविधा
- आरामदायी बसण्याची व्यवस्था
- विश्रांतीसाठी स्वतंत्र जागा
- आवश्यक प्राथमिक उपचार साहित्य
४) जागरूकता व मार्गदर्शन
- आरोग्य व स्वच्छता विषयक माहिती फलक
- किशोरवयीन मुलींसाठी मार्गदर्शन उपक्रम
-
अपेक्षित परिणाम:
- विद्यार्थिनींच्या आरोग्य व स्वच्छतेत सुधारणा
- शाळेत उपस्थितीत वाढ
- मुलींमध्ये आत्मविश्वास व सुरक्षिततेची भावना वाढेल
- शिक्षणात सातत्य राखण्यास मदत
- पिंक रूम ही मुलींसाठी एक महत्वाची सुविधा ठरून पिराचीवाडी गावात स्त्री सक्षमीकरण व शिक्षणाला चालना देणारा उपक्रम आहे.




