पिराचीवाडीतील स्वागत कमान – ₹४.२५ कोटी (425 लाख) कामाची माहिती -:
पिराचीवाडी गावाच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी व गावाच्या ओळखीला भव्य स्वरूप देण्यासाठी अंदाजे ₹४.२५ कोटी निधीतून स्वागत कमान उभारण्याचे काम करण्यात आले आहे.
कामांचा तपशील:
- गावाच्या प्रवेशद्वारावर भव्य स्वागत कमान उभारणी
- आकर्षक आर्किटेक्चरल डिझाईन व कोरीव काम
- LED लाईट व सजावटीची प्रकाश व्यवस्था
- कमानीवर गावाचे नाव व स्वागत संदेश
- रंगरंगोटी व सुशोभीकरण कामे
- परिसरात पेवर ब्लॉक व रस्ते सुधारणा
- हरितीकरण व सौंदर्यीकरण (लँडस्केपिंग)
- सुरक्षितता व मजबुतीकरणासाठी दर्जेदार बांधकाम
या भव्य स्वागत कमानीमुळे पिराचीवाडी गावाची ओळख अधिक आकर्षक झाली असून गावात येणाऱ्या नागरिकांचे व पाहुण्यांचे भव्य स्वागत केले जाते. गावाच्या विकासात ही कमान एक महत्त्वाचा टप्पा ठरली आहे.





