ताज्या बातम्या व अद्यतन 📢 गावातील प्रत्येक महत्त्वाची बातमी — एका ठिकाणी, एका क्लिकमध्ये
1️⃣ 📰 या विभागामध्ये ग्रामपंचायतीच्या सर्व ताज्या बातम्या, घोषणा आणि कार्यक्रमांची माहिती दिली जाते.
2️⃣ 📅 येथे तुम्ही ग्रामसभा आणि विशेष उपक्रमांची अद्ययावत माहिती पाहू शकता.
3️⃣ 🏗️ आमचं उद्दिष्ट आहे की गावातील प्रत्येक नागरिकाला वेळोवेळी आणि पारदर्शक माहिती मिळावी.
4️⃣ 📢 सर्व घडामोडी नागरिकांच्या सहभागातून पारदर्शकपणे राबवल्या जातात — तुमचं सहकार्य आमच्यासाठी महत्त्वाचं आहे.
5️⃣ 🌿 नवीन माहिती नियमितपणे येथे प्रकाशित केली जाते, म्हणून हे पान वारंवार भेट द्या आणि गावाच्या प्रगतीशी जोडलेले राहा.
शेतकऱ्यांना मशागतीसाठी २५ टक्के अनुदानावर ट्रॅक्टर पिराचीवाडी ग्रामपंचायतीचा अभिनव उपक्रम
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानअंतर्गत गावचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी धडपड करणाऱ्या कागल तालुक्यातील पिराचीवाडी ग्रामपंचायतीने गावातील शेतकऱ्यांना शेतीकामांसाठी २५ टक्के अनुदानावर ट्रॅक्टर ट्रॉली उपलब्ध करून दिली आहे. यासाठी ग्रामपंचायतीने सर्व आवजारांसह ट्रॅक्टर ट्रॉलीची खरेदी केली आहे. अशी योजना देणारी राज्यातील ही एकमेव ग्रामपंचायत असून, इतरानांही आदर्शवत आहे. घरफाळा पाणीपट्टी भरलेल्या शेतकऱ्यांनाच या योजनेचा लाभ देण्याचा निर्णय ग्रामपंचायत प्रशासनाने घेतला आहे. एकेकाळी हमालांचे गाव म्हणून जिल्ह्यात परिचित असणारे पिराचीवाडी मशागतीसह शेतोपयोगी हे गाव समृद्ध आणि स्वायत्त बनले आहे. दुर्गम डोंगराळ भागात असणाऱ्या या गावात रस्ते आरोग्याची वानवा होती. त्याशिवाय पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या पाण्याचेही दुर्भिक्ष होते. आठ वर्षांपूर्वी सुभाष भोसले यांनी सरपंचपदाची सूत्रे हातात घेतली आणि विकासाचे मॉडेल म्हणून गावचे नाव राज्याच्या नकाशावर पोहचविण्याचा चंग बांधला. दूधगंगा नदीतून तीन टप्प्यांत पाणी योजना साकारली. त्यामुळे येथील पिण्यासह शेतीच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागला. नांगरणीपासून सर्व कामे करणार … अनेकदा शेती हा धंदा बेभरवशाचा होतो. त्यामुळे सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांचा निर्णय होऊन ट्रॅक्टर ट्रॉली खरेदी केली आहे. यामध्ये खत ओढवणीपासून शेताची नांगरट, रोटर, सरी सोडण्यापर्यंतची सर्व कामे २५ टक्के अनुदानावर करण्यात येणार आहेत.
पिराचीवाडीत अॅनिमिया मुक्त भारत अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद
पिराचीवाडी येथे केंद्र शासनाच्या अॅनिमिया मुक्त भारत अभियान अंतर्गत आरोग्य तपासणी व जनजागृती कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला. या अभियानात गावातील महिला, युवक व ज्येष्ठ नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. कार्यक्रमादरम्यान डॉ. मोहसीन शानेदिवान यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य पथकाने नागरिकांची हिमोग्लोबिन तपासणी केली. रक्तक्षय (अॅनिमिया) आढळलेल्या रुग्णांना आयर्न गोळ्या व आवश्यक औषधांचे वितरण करण्यात आले. या उपक्रमात आरोग्य सेवक डॉ. नितीन पातले, आरोग्य सेविका डॉ. मनीषा कांबळे, तसेच आशा सेविका रेखा संजय भोसले व राजश्री रविकुमार भोसले यांनी सक्रिय सहभाग घेतला. यावेळी नागरिकांना संतुलित आहार, हिरव्या पालेभाज्या, फळे व पोषणयुक्त अन्नाचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. नियमित तपासणी व योग्य आहारामुळे अॅनिमियावर नियंत्रण मिळवता येते, असे तज्ज्ञांनी सांगितले. या उपक्रमामुळे ग्रामस्थांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता वाढली असून, भविष्यात अशा कार्यक्रमांची गरज असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. उपस्थितांनी आरोग्य विभागाचे कौतुक करून सर्वांचे आभार मानले.
पंधरा वर्षीय आयुष दाभोळेची ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’ मध्ये नोंद
पिराचीवाडीतील विद्यार्थी कोल्हापूर येथे शिकत असलेला आयुष संजय दाभोळे याने ‘ऑप्टिमम इनव्हिजिबिलिटी सेटअप’ या विषयावर केलेल्या प्रयोगात्मक संशोधनामुळे’इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’ मध्ये स्थान मिळवले आहे. कमी खर्चात केलेल्या या प्रयोगावरील त्याचा शोधप्रबंध ‘इंडियन जर्नल ऑफ टेक्निकल एज्युकेशन’ मध्येही प्रकाशित झाला आहे. भविष्यात संशोधनाचा उपयोग वैद्यकीय उपकरणे वकसित करण्यासाठी करण्याचा त्याचा मानस आहे. आयुष केवळ संशोधक नसून एक प्रतिभावान लेखक, कवी आणि पत्रकारही आहे. त्याच्या मद विंटर पाल्सफया पुस्तकाचा राष्ट्रीय स्तरावर गौरव झाला आहे. शालेय वयातच विविध क्षेत्रात मिळवलेल्या या अष्टपैलू यशाबद्दल त्याच्यावर सर्ब्व स्तरांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. आयुषने हे काम करण्यासाठी सखोल अभ्यास करत खूप मेहनत घेतली आहे.
तरुणीचा अभिमानास्पद प्रवास – गीता डावरे यांची बँकेत निवड
पिराचीवाडीतील (ता. कागल), डॉ. संजय हिंदुराव दाभोळे हे एनआयटी कॉलेजमध्ये प्रोफेसर म्हणून निवड आणि गीता संजय डावरे यांची पंजाब नॅशनल बँकेत कृषी सहायक म्हणून निवड झाल्याबद्दल सरपंच मा. सुभाष पांडुरंग भोसले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यांच्या या यशाबद्दल गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. निवड झालेल्या उमेदवारांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित कार्यक्रमात गावातील प्रमुख नागरिक, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. निवड झालेल्या सदस्यांनी बँकेच्या प्रगतीसाठी व पारदर्शक कारभारासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. गीता डावरे यांनी आपल्या यशाचे श्रेय कुटुंबीय व मार्गदर्शकांना देत बँकेच्या प्रगतीसाठी व ग्राहकांना उत्कृष्ट सेवा देण्यासाठी प्रामाणिकपणे काम करण्याचे आश्वासन दिले.या प्रसंगी उपस्थितांनी निवड झालेल्या सदस्यांचे कौतुक करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
प्राथमिक शाळा, अंगणवाडी व गावातील सार्वजनिक आड येथे सौर उर्जा प्रकल्प – पिराचीवाडीचा हरित उपक्रम
पिराचीवाडी (ता. कागल) येथे ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने प्राथमिक शाळा, अंगणवाडी तसेच गावातील आड (विहीर/पाणी व्यवस्था) येथे सौर उर्जा प्रकल्प यशश्वीपणे सुरु करण्यात आला आहे. या उपक्रमामुळे शाळा व अंगणवाडीतील वीज पुरवठा सुरळीत होणार असून विद्यार्थ्यांना चांगल्या सुविधा मिळणार आहेत. तसेच गावातील आडवर सौर पंप बसविण्यात आल्यामुळे पाण्याची समस्या सोडविण्यास मदत होणार आहे. सौर उर्जेच्या वापरामुळे वीज खर्चात बचत होऊन पर्यावरण संराक्षणालाही हातभार लागणार आहे. हा प्रकल्प स्वच्छ व नुतनीकरणीय ऊर्जेकडे गावाची वाटचाल दर्शवतो. ग्रामपंचायातीच्या या उपक्रमामुळे पिराचीवाडी गाव इतर गावांसाठी आदर्श ठरत असुस्न भविष्यात अश्या आणखी योजनांची अंमलबजावणी करण्याचा मानस व्यक्त करण्यात आला आहे. “सौर उर्जा – गावाच्या प्रगतीचा नवा मार्ग”
पिराचीवाडी येथे सौर उर्जा प्रकल्पाची यशश्वी उभारणी -ग्रामपंचायातीचा हरित उपक्रम
पिराचीवाडी (ता. कागल) यथे ग्रामपंचायतीच्या वतीने सौर उर्जा प्रकल्प यशश्वीपणे उभारण्यात आला आहे. वाढत्या वीज खर्चाला आला घालण्यासाठी तसेच पर्यावरण संरक्षणासाठी हा महत्वाचा उपक्रम राबविण्यात आला आहे . ग्रामपंचायत कार्यालयाच्या इमारतीवर सौर पॅनल बसविण्यात आले असून यामुळे विजेची मोठ्या प्रमाणावर बचत होणार आहे. तसेच हा प्रकल्प स्वच्छ व नुतनीकरण उर्जेचा वापर वाढविण्यासाठी एक आदर्श उदाहरण ठरत आहे. या उपक्रमामुळे गावाला स्वंयपूर्णतेकडे वाटचाल करता येणार असून भविष्यात इतर ठिकाणीही असे प्रकल्प राबविण्याचा विचार ग्रामपंचायतीने व्यक्त केला आहे. “हरित उर्जा – स्वच्छ पर्यावरण” या संकल्पनेला पिराचीवादीचा पुढाकार!
पिराचीवाडीतील पिंक रूम आदर्श माॅडेल
पिराचीवाडी (ता. कागल) येथील प्राथमिक शाळेत उभारलेली पिंक रूम ही राज्यातील जिल्हा परिषद शाळांमधील आदर्श माॅडेल असल्याचे सीईओ एस. कार्तिकेयन यांनी गौरवोदगार काढले. मासिक पाळीदरम्यान मुलीना विश्रांती, नॅपकिन,औषधे व आवश्यक सुविधा मिळाव्यात म्हणून ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या सूचनेनुसार हा उपक्रम राबविला असून, ग्रामपंचायतीच्या सहकार्याने सर्व सोयींनीयुक्त पद्धतीने उभारणी करण्यात आली आहे. पिराचीवाडी (ता. कागल) येथील प्राथमिक शाळेत किशोरी अभियानांतर्गत पिंक रूमच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सरपंच कल्पना भोसले होत्या. यावेळी गटविकास अधिकारी कुलदीप बोंगे, प्रभारी गट शिक्षणाधिकारी सारिका कासोटे, तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. फारूक देसाई प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कासोटे म्हणाल्या, ‘पिंक रुममुळे मुलींना निर्भयपणे महिनाभर शाळेत उपस्थित राहता येणार आहे. यामध्ये मुलींना विश्रांती घेता येणार असून येथे नॅपकिन पेपर, आयुर्वेदिक औषधे तसेच हळद, गुळ, गरम पाण्याची पिशवीही ठेवण्यात येणार आहे. सरपंच कल्पना भोसले म्हणाल्या, ‘मुख्यमंत्री समृद्ध ग्राम योजनेत सहभागी असण्याऱ्या म्हाकवे गावाने अनेक लोकोपयोगी उपक्रम हाती घेतले आहेत. त्यापैकी किशोरवयीन मुलींसाठी अत्यंत उपयुक्त असणारा पिंक रूमचा उपक्रम अत्यंत काळजीपूर्वक आणि सर्व सोयीनयुक्त राबविला आहे. लक्ष्मी पाटील यांनी स्वागत केले. माजी सरपंच सुभाष भोसले, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष नाथाजी भोसले, नामदेव पाटील, उपसरपंच कल्पना पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास कोमल सावंत, युवराज माने, कृष्णात भोसले आदी उपस्थित होते. मुख्याध्यापक के. आर. पाटील यांनी आभार मानले.
पिराचीवाडीचा विकास म्हणजे गावच्या एकसंधपणाचे द्योतक
स्वच्छ हवा, पाणी आणि परिसर ही ग्रामीण जीवनाची संकल्पना तंतोतंत वास्तव्यात आणलेली पिराचीवाडी गावातील विकासकामे पाहताना गावच्या एकसंघपनाची हवा वाटते, असा शब्धात जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांनी गावकऱ्यांच्या कामावर समाधानाची भावना व्यक्त केली. येथील नियोजन आणि दूरदृष्टी इतर गावानाही अनुसरण्यासारखी आहे, असे गौरवोद्वार त्यांनी काढले. पिराचीवाडी येथील मंजूर असणाऱ्या घरकुल योजनेतील लाभार्थ्यांना घरकुलाचा पाया खुदाई प्रारंभ व मुख्यमंत्र्यांच्या समृद्ध ग्राम योजनेत सहभागी म्हणून या गावाला भेट असा संयुक्त हेतूने त्यांनी दौरा केला. आरोग्यस्थानांची सर्वेक्षणे करून माहिती घेतली. कार्तिकेयन एस. यांनी जवळपास साडेतीन तास गावातील विकासकामाची पाणी करून सविस्तर माहिती घेतली. गावाची स्वच्छता, दुतर्फा लावलेली झाडे, ग्रामपंचायत इमारत, ऐतिहासिक दगडी बुरुज आणि सालात असलेली शिवापुत्री पर्यटनस्थळ अशी बंधुवृती कृती आढळली. वृक्षसंवर्धनाचे कार्य आवर्जून कार्तिकेयन म्हणाले, मुख्य मार्गासह गावातील रस्त्यांच्या दुतर्फा नियोजनबद्ध लावलेली झाडे गावाला सौदंर्य भर घालणारी आहे. ही बाब कौतुकास्पद आहे. यावेळी उपस्थित गट विकास अधिकारी कुलदीप भोंगे, आरोग्य अधिकारी फारूक देसाई, गट शिक्षनाधिकारी सारीका कासोटे, माजी सरपंच सुभाष भोसले, उपसरपंच कृष्णा पाटील, नवनाथ भोसले, नामदेव पाटील, सोमेश सावंत, धनंजय भोसले, रत्नाकर जाधव आदी उपस्थित होते.
पिराचीवाडी ग्रामविकासाचा आदर्श नमुना
पिराचीवाडी (ता. कागल) येथे घरकुल योजनेतील लाभार्थ्याच्या घरकुल पायाखुदाईचा प्रारंभ तसेच मुख्यमंत्री समृध्द ग्राम योजनेत सहभागात गावभेट असा संयुक्त कार्यक्रम आयोजित केला होता. कार्यक्रमास मा. मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. उपस्थित होते. अध्यक्षस्थानी सरपंच कल्पना भोसले होत्या. कार्तिकेयन म्हणाले, ‘गावच्या मुख्य मार्गासह अंतर्गत रस्त्याच्या दुतर्फा नियोजनबद्ध लावलेली झाडे गावाच्या सौंदर्यात भर घालत आहेत. ग्रामपंचायत प्रशासनाने ठिबक सिंचनाचा वापर करून वृक्षसंवर्धनाला चालना दिली असून, मोकळ्या जागांमध्ये वनराई निर्माण केली आहे. ही बाब निश्चितच कौतुकास्पद आहे. कार्तिकेयन यांनी जवळपास साडेतीन तास गावातील विविध विकासकामाची पाणी करून सविस्तर माहिती घेतली. अदयावत ग्रामपंचायत इमारत, प्राथमिक शाळेची देखणी इमारत, अंगणवाडी, ऐतिहासिक बुरुज, साकारत असलेली शिवसृष्टी, पर्यटनस्थळासारखी विकसित करण्यात आलेली वैकुंठभूमी, कुस्ती आखाडा, रस्त्यांच्या दुतर्फा नियोजनबद्ध वृक्षरोपण तसेच गहिनीनाथ मंदिरानजीक केलेल्या वृक्षारोपणाची त्यांनी पाणी केली. यावेळी गटविकास अधिकारी कुलदीप बोंगे, गटशिक्षणाधिकारी सारीका कासोटे, तालुका आरोग्य अधिकारी फारूक देसाई, माजी सरपंच सुभाष भोसले, उपसरपंच काल्पना पाटील, नाथाजी भोसले, नामदेव पाटील, कोमल सावंत, युवराज माने, कृष्णात भोसले, आदी उपस्थित होते.